चोरट्यांचा सिनेस्टाईल पाठलाग;तीन आरोपींना अटक; लासूर स्टेशन येथील घटना!

Foto

औरंगाबाद : सिनेस्टाईल चोरट्यांचा पोलिसांनी पाठलाग करून त्यांना अटक केल्याची घटना मध्यरात्री लासुर स्टेशन येथे घडली. तीन महिला आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास उभ्या असलेल्या बोरवेल गाडीच्या समोरील भागातून काही वस्तू चोरटे चोरत असल्याचे नागरिकांना दिसले. नागरिकांनी उभ्या असलेल्या बोरवेल च्या गाडीची पाहणी केली असता गाडीचा समोरील भाग उघडा दिसला. त्यामुळे संबंधित महिलांना नागरिकांनी थांबण्यासाठी हाक दिली तेव्हा महिलांनी पोबारा केला. नागरिकांना त्यांच्यावर संशय आल्यामुळे ही माहिती तात्काळ शिल्लेगाव पोलीस ठाण्याला कळवली.पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी धाव घेतली असता, घडलेली हकीगत नागरिकांनी पोलिसांना सांगितली. पोलिसांनी महिलांचा तब्बल सतरा किलोमीटर सिनेस्टाईल पाठलाग करून तीन महिलांना  ताब्यात घेतले आहे. सदरील कामगिरी पोलिस निरीक्षक बालक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. महिलांनी बोअरवेलच्या गाडीतील रेडिएटरची चोरी केल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत या महिला आरोपींनी लासूर स्टेशन परिसरातून काय काय चोरी केले आहे त्याबाबत पोलिसतपास  करत आहेत.